Ruia Natyavalay

About Us


रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे ‘रुईया नाट्यवलय’ म्हणजेच कलाकारांची फॅक्टरी ! असे म्हणणे अजिबातच अतिशयोक्ती ठरणार नाही. रुईयाला असलेला उज्ज्वल सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचे काम आजही रुईया नाट्यवलय त्याच दिमाखात करत आहे. नाटक म्हणजे प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार. तो शिकण्याची प्रक्रिया हा तितकाच सृजनशील प्रयत्न. रुईया नाट्यवलयच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे.

नाटकाशी संबंधित सर्व प्रक्रियांमधून ताऊन सुलाखुन बाहेर पडलेले नाट्यवलयचे विद्यार्थी कलाक्षेत्रात किती अग्रेसर आहेत याविषयी वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही. नाट्यवलय ही फक्त महाविद्यालयातील एक संस्था नसून कलाकृती घडवणारे छोटेसे ‘रुईया स्कूल’ आहे. मराठी नाटक, दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट यांच्यातील यशस्वी कलाकारांचा ‘लसावी’ म्हणजे रुईया नाट्यवलय. हे जेवढं महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहामध्ये कार्यरत आहे तेवढेच ते डीपी’ समोरच्या कट्ट्यावरही जागृत आहे असे म्हणता येईल.

रुईयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची औपचारिक आणि अनौपचारिक भेट होते नाट्यवलय या माध्यमातूनच. ज्येष्ठांचे पाठबळ, त्यांचे खडे बोल आणि प्रेमळ सूचना स्वीकारूनच नवी पिढी नाटकाच्या प्रोसेसला सुरुवात करते. संहिता लेखन, नेपथ्य, रंगभूषा, प्रकाश योजना अशा नाटकाशी संबंधित सर्व बाबींचे थेट प्रशिक्षण नाट्यवलयच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना मिळते. या नाट्यवलयच्या वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी खरेतर एखादे पुस्तकच लिहावे लागेल.

Talk to Us